बातम्या

मोहन भागवतांच्या नेतृत्वात बॉम्बस्फोट घडवला?

सकाळ न्यूज नेटवर्क


संघाने आजवर अनेक अतिरेक्यांना जन्म दिला आहे. देशभक्तीच्या नावावर आणि संघाच्या निर्देशानुसार माझ्या हाताने अनेकांचा बळी गेला, असा  खळबळजनक खुलासा आंध्रप्रदेशातील संघाचे माजी प्रचारक पी. विजय शंकर रेड्डी यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत केला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे. संघाचे तत्कालीन सरकार्यवाह डॉ. मोहन भागवत यांच्या नेतृत्वात मी अनेक बॉम्बस्फोटात सहभागी होतो.

विजय शंकर यांच्या वक्तव्याचा मराठीत अनुवाद भारत वाघमारे यांनी केला. विजय शंकर म्हणले, मी बारा वर्षे संघाचा प्रचारक म्हणून काम केले. यादरम्यान अनेक अनुचित गोष्टी घडल्या. ज्या चुकीच्या होत्या याची जाणीव मला झाली आणि मी संघाला रामराम ठोकला. बॉम्बस्फोटासारखे कृत्य संघाने केले असून मी देखील त्याचा एक भाग होतो. माझ्याजवळ या संदर्भातील सर्व पुरावे आहेत. संघाने माझ्यावर दोनवेळा प्राणघातक हल्ला केला आहे. संघाचा काळा चेहरा समोर आण्यासाठी मी ‘मी देशभक्त के नाम पर आरएसएसके काले कारनामे’  हे पुस्तक काढले आहे. संघाचे काम असहाय्य झाल्याने काहींनी विष घेऊन तर काहींनी गळफास घेऊन आत्महत्या देखील केली आहे. असे निराश झालेले अनेक प्रचारक माझ्या संपर्कात आहेत. अशांना घेऊन मी  लवकरच दिल्ली येथे  संघातील बढय़ा नेत्यांच्या नावांचा खुलासा करणार असल्याचेही विजय शंकर यांनी सांगितले. या संदर्भात मी सरसंघचालक यांच्याशी आमोरा-समोर चर्चा करायला तयार असल्याचेही विजय शंकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mohan Bhagwat Bomb Spot 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT